लहानपणीच्या आठवणींपासून कलात्मक सुंदरतेपर्यंत! | Mumbai Cha Chitrakar | Nehru Park

मुंबईतील कमला नेहरू पार्कमधील ‘बूट घालणारी म्हातारी’ ही एक आठवणींची आणि आकर्षक ठिकाण आहे, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपलेसे वाटते.
‘There was an old woman who lived in a shoe’ या इंग्रजी बालगीताने प्रेरित झालेली ही कल्पना पिढ्यानपिढ्या मुंबईकरांच्या मनात घर करून आहे.
या कलाकाराने आपल्या Digital कलेत ‘बूट घालणाऱ्या म्हातारी’ला कलात्मकपणे जीवंत केलं आहे.
तुम्हाला माहित आहे का?
मालबार Hills वरील हा बुटाच्या आकाराचा रचनाकार 1952 पासून मुंबईच्या छटेचा एक अविभाज्य भाग आहे! गेल्या 70 वर्षांपासून ही रचना इथे लहान मुलांच्या किलबिलाटाच्या, कुटुंबीय सहलींच्या आणि अमूल्य आठवणींच्या साक्षीदार आहे.
या Digital Art द्वारे, कलाकाराने म्हातारीला जिवंत करून एक हृदयस्पर्शी कल्पना साकारली आहे – आपल्या बूटाच्या घरासमोर बसून ही म्हातारी जणू दररोज पिढ्यानपिढ्या येणाऱ्या मुलांच्या किलबिलाटाकडे पाहते आहे , त्यांच्या चेहऱ्यावरचं नवल आणि त्यांच्या डोळ्यांतलं आश्चर्य... तिच्या या अनोख्या घराने कित्येक बालपणं रंगवली आहेत, आणि आजही ती तेवढ्याच प्रेमाने आपल्या बूट घराची गंमत सांभाळते आहे ! :house::sparkles:
#MumbaiLandmarks #OldLadyShoe #ArtAndCulture #MumbaiVibes #DigitalArt #CreativityUnleashed #BetterIndiaMarathi

Related Articles
Here are a few more articles:
Read the Next Article
Subscribe