New Update
शिकारीचं काम करणारा पारधी समाज पिढ्यानपिढ्या शिक्षण, रोजगार आणि मुख्य प्रवाहापासून वंचित राहिला आहे.अशा समाजातील मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, आपल्या शिपाईच्या नोकरीतूनही अथक प्रयत्न करणारे अहिल्यानगरचे अनंत झेंडे व त्यांच्या प्रयत्नांना बळ देणारी बाबा आमटे सामाजिक संस्था – यांच्यावर The Better India Marathi ने व्हिडीओ केला.या व्हिडीओला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनेकांपर्यंत आमचं काम पोहोचलं, आणि मदतीचे नवे हात पुढे येत आहेत.आमच्या कार्याची दखल घेऊन ती समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवल्याबद्दल The Better India Marathi चे मनःपूर्वक आभार.
[ Anant Zende, Impact Video, Social Work, Pardhi Community , Motivation, Education, Ahmednagar ]