शनिवारी, 2 ऑगस्ट रोजी Red Soil Stories चे शिरीष गवस आपल्यातून निघून गेले. त्यांनी आपल्या मागे केवळ व्हिडिओंचा संग्रह नाही, तर एका चळवळीचा वारसाच सोडला आहे.
Red Soil Stories च्या माध्यमातून त्यांनी केवळ कोकणातील नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या आणि जगभरातल्या मराठी मनांमध्ये एक नातं जागवून ठेवलं—आपल्या मातीशी, आपल्या खाद्यसंस्कृतीशी, आणि आपल्या परंपरांशी.
कोरोनाच्या काळात नोकरी गेल्यानंतरही, हताश न होता शिरीष आणि पूजा यांनी गावी परतून कोकण गाठलं. त्यातून उभं राहिलं एक संस्कृतीचं आंदोलन—Red Soil Stories या YouTube चॅनलचं रूप घेत.
पाहता पाहता, आज कित्येक लोक या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्याशी जोडले गेले आहेत, आणि 40 हून अधिक देशांमध्ये त्यांचे व्हिडिओ पाहिले जातात.
आज शिरीष यांच्या जाण्याने प्रत्येकजण हळहळ व्यक्त करत आहे.
शिरीष गवस यांना ‘द बेटर इंडिया’तर्फे मनःपूर्वक श्रद्धांजली. :pray: :bouquet:
[ Red Soil Stories, Heartfelt Tribute to Shirish Gavas, Kokan Culture, Preserving Traditions ]
Related Articles
Here are a few more articles:
{{#pages}}
{{/pages}}