New Update
सकाळी 8 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कुंभच्या मोठ्या स्वयंपाकघरात काम करणाऱ्या 75 वर्षांच्या अंजू आजी! त्या कुंभच्या स्वयंपाकघरात चपात्या लाटून स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी चार पैसे कमवत आहेत.
सूरतहून कुंभमध्ये आलेल्या या आजींच्या कुटुंबात त्यांची सून आणि नातवंडे आहेत. सगळेच लहान-मोठी मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात.
अशा परिस्थितीत आजींनी येथे स्वतःसाठी काम शोधले, ज्यामुळे सेवेसोबतच काही पैसेही कमवता येतात.
कडाक्याच्या थंडीतही आजी दररोज आनंदाने पीठ मळून चपात्या लाटण्याचं काम करत आहेत.
या वयातही काम करण्याची त्यांची मेहनत आणि जिद्द नक्कीच कौतुकास्पद आहे.
#Kumbh2025#MahakumbhKitchen#KumbhPrayagraj#SeniorCitizensHardwork#KumbhExperience#AgeIsJustANumber#Prayagraj